Adjustment of free textbooks under Samagra Shiksha PM Shri
Adjustment of free textbooks under Samagra Shiksha PM Shri
Adjustment of free textbooks under Samagra Shiksha and PM Shri for the year 2025-26
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
अतितात्काळ/महत्वाचे/प्राधान्याने.
जा.क्र.मप्राशिप/सशि/मोपापु/कास/२०२५-२६/2082
दि. 15 JUL 2025
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.
३) प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी नगरपलिकासर्व.
विषय : समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन २०२५-२६ च्या समायोजनाबाबत.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन २०२५-२६ अंदाजपत्रक तयार करण्यासाठी यु-डायस प्लस सन २०२३-२४ डाटा वापरण्यात आलेला होता. ज्या वेळेस समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन २०२५-२६ अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते त्यावेळेस यु-डायस प्लस सन २०२४-२५ डाटा तयार झालेला नव्हता. सद्यस्थितीत यु-डायस प्लस सन २०२४-२५ डाटा तयार झालेला आहे.
यु-डायस प्लस सन २०२३-२४ नुसार, समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांसाठी निकषपात्र विद्यार्थ्यांची एकूण संख्या १,००,९४,३६० आहे. तर यु-डायस प्लस सन २०२४-२५ नुसार समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांसाठी निकषपात्र विद्यार्थ्यांची एकूण संख्या ९७,५७,९४४ आहे. सन २०२३-२४ व सन २०२४-२५ च्या यु-डायस प्लस वरिल माहितीनुसार ३,३६,४१६ विद्यार्थी कमी झालेले आहेत. सोबत जिल्हानिहाय विद्यार्थी संख्येतील फरकाचे प्रपत्र जोडले आहे. सदर बाब विचारात घेता सन २०२५-२६ मध्येही विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. यामुळे शाळांकडे मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तके शिल्लक राहू शकतात.
सन २०२५-२६ मध्ये विद्यार्थी संख्या वाढल्याचे तसेच संपूर्ण पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्याबाबत विविध संघटनांचे पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. यापूर्वीच्या काही वर्षातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळांमधील विद्यार्थी नोंदणीची आकडेवारी पाहता एकूण विद्यार्थी संख्येत वाढ न होता, काही ठिकाणचे विद्यार्थी स्थलांतरीत होऊन दुसऱ्या शाळेत/तालुक्यात प्रवेशित झालेले असू शकतात. सदर बाब विचारात घेता, विद्यार्थी ज्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेशित झाले असतील त्या शाळांमधून पाठ्यपुस्तकांचे तात्काळ समायोजन करण्यात यावे. तसेच शाळाबाहय विद्यार्थ्यांनी अथवा विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय अथवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी शिल्लक असलेलया पाठ्यपुस्तकांमधून समायोजन करण्यात यावे. कोणताही निकषपात्र विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
उपरोक्त समायोजनाची कार्यवाही दि.१८/०७/२०२५ पर्यंत पूर्ण करावी व याबाबत केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.
(संजय यादव, मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई