World Tourism Day Quiz With Certificate
World Tourism Day Quiz With Certificate
World Tourism Day Quiz
Jagtik Parytan Din
जागतिक पर्यटन दिन...
वाहतुकीच्या साधनांत आणि प्रकारांत वाढ झाल्याने आणि विमानसेवेचे जाळे विस्तारल्याने हौशी पर्यटकांना जगातल्या कोणत्याही देशात जाणे शक्य बनले आहे. काही अशांत देश वगळता बहुतेक सर्व देशांमध्ये पर्यटन करणे फारसे अवघड राहिलेले नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
World Heritage Day Quiz जागतिक वारसा दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र लगेच प्राप्त करा
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे विशेष योगदान असते. देश-विदेशातून येणारे अनेक पर्यटक वाहतुकीपासून ते हॉटेल्स, शॉपिंग आणि पर्यटन स्थळांच्या तिकिटांपर्यंत आदी गोष्टींवर पैसे खर्च करतात. यामुळे देशाच्या महसुलामध्ये वाढ होते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार २७ सप्टेंबर १९८० रोजी ‘पहिला जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्यात आला.
भारत सरकारने पर्यटन उद्योगापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन अनेक राज्यांतील उत्तमोत्तम पर्यटनस्थळांचा विकास, पायाभूत सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विदेशातील पर्यटकांचा ओढा भारताकडे वाढला आहे. महाराष्ट्र सरकारही याबाबत मागे नाही. अनेक पर्यटनस्थळे विकसित होत आहेत. त्या त्या स्थानांचे महत्त्व ओळखून अनेक खाजगी कंपन्या सेवा पुरवत आहेत. पर्यटन हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…
जागतिक पर्यटन दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा
Bahut hi achcha questions tha aapka I am grateful to solve this questions thank you
Thank you
पर्यटन दिवस हा महत्त्वाचा असतो.आणि सर्व नागरिकांनी एक झाड लावले पाहिजे झाड लावले तर आपल्या ला Oxygen मिळते पर्यटन दिवस हा सगळा महाराष्ट्र साजरा करतो सगळ्या नागरिकांन वर हि जबाबदारी आहे तरी काही नागरिक झाड लावत नाही तर त्या सर्व नागरिकांनी एक झाड लावले पाहिजे आणि आपल्या कुटुंबियांना एक झाड लावा असे सांगितले पाहिजे .
मला हा पर्यटन दिवस खुप आवडतो