Vidyarthi Suraksha Upay Yojna विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजना

Vidyarthi Suraksha Upay Yojna

Vidyarthi Suraksha Upay Yojna

महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य, पुणे

न्यायालयीन प्रकरण

जा. क्र.आस्था-क/प्राथ १०६/शा.प.-११९/२०२५/1514273

दि.30.10.2025

विषय : सुमोटो जनहित याचिका क्र.१/२०२४ मधील मा. न्यायालयाचे आदेश दि.१०.१०.२०२५ नुसार कार्यवाही करण्याबाबत

संदर्भ :- उक्त याचिका प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे आदेश दि.१०.१०.२०२५

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र.१/२०२४ प्रकरणी मा. न्यायालयाचे दि.१०.१०.२०२५ रोजीच्या आदेशाचे अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)

त्यानुसार सर्व शाळांनी (शासकीय, खासगी, आश्रमशाळा, अंगणवाडी, बालगृहे) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजनांची माहिती संकेतस्थळावर दि.१५.१०.२०२५ पर्यंत नोंद करुन प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला सदर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश आहेत. शाळांनी शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर

https://education.maharashtra.gov.in/school/users/studentSecurityPublic

नोंद केलेल्या माहितीबाबत शाळेच्या दर्शनी भागामध्ये पोर्टलची माहिती दर्शविणारा फलक लावून पालकांच्या निर्दशनास आणून द्यावा. जेणेकरून संकेतस्थळास भेट देऊन पालकांना शाळेच्या विद्यार्थी सुरक्षेच्या अंमलबजावणीची स्थिती जाणून घेता येईल.

सर्व शाळांनी विद्यार्थी सुरक्षितते संदर्भात शासन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सुधारित माहिती स्कुल पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यानुसार मासिक बैठकांची संक्षिप्त माहिती व इतर सुधारणा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत अद्ययावत करणेबाबत सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. तसेच, विद्यार्थी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिका-यांनी शाळांना आस्कमिक भेट देण्याचेही मा. न्यायालयाचे निर्देश आहेत. शाळांकडून या उपययोजनांमध्ये कुठेही शिथिलता आढळल्यास संबंधित शाळा/व्यवस्थापनांकडून सत्वर अंमलबजावणी करुन घेण्यात यावी. सर्व पर्यवेक्षिय अधिकारी यांनी भेट दिलेल्या शाळांचा संकलीत अहवाल एकस्तर वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.

मा. उच्च न्यायालयाचे निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल, पुढील १५ दिवसांत सादर करावा.

आयुक्त (शिक्षण) म.रा., पुणे

Vidyarthi Suraksha Upay Yojna
Vidyarthi Suraksha Upay Yojna

ALSO READ 👇

IMG 20241205 201619
Vidyarthi Suraksha Upay Yojna

Vidyarthi Suraksha Upay Yojna

Urgent measures to be taken at school level in line with policy formulation regarding student safety

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजना

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे

क्रमांक: प्राशिसं ८०२/विसुरक्षा/२०२४/७५६७ प्रति,

दिनांक- ०३.१२.२०२४

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. (सर्व)
३. प्रशासन अधिकारी/शिक्षणप्रमुख/शिक्षणाधिकारी मनपा/नप/नपा (सर्व)

विषय : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत

संदर्भ: शासन निर्णय क्र सुरक्षा-२०२४/प्र.क्र.२८४/एस.डी.-४, दि २६.०९.२४

उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधिश मा. श्रीमती साधना एस. जाधव, मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१.१०.२०२४ रोजी सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समितीने मान्यता प्राप्त शाळांनी तातडीने उपाययोजना करावयाच्या मुद्याबाबत चर्चा झाली.
समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाने शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने करावयाच्या कार्यवाहोचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.


शाळा व्यवस्थापनाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजना

१ सर्व शाळांमध्ये प्रसाधनगृह ही स्वच्छ व वापरण्यायोग्य असवीत, सहा वर्षाखालील काळजी घेण्यासाठी महिला कर्मचारीच असावेत. प्रसाधनगृहामध्ये अलार्म अथवा बजरची व्यवस्था असावी.
२ शाळा, शालेय परिसर येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. कार्यान्वित सीसीटिव्ही यंत्रणेचे कमीत कमी एका महिन्याचे बॅकअप करणे आवश्यक आहे
३ शालेय विद्यार्थी वाहतूक दरम्यान महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे
४ शाळेत तक्रार निवारण समिती कार्यान्वित असावी. त्यांच्या नियमित बैठका होणे आवश्यक आहे.
५ प्रत्येकशाळेत तक्रार पेटी आवश्यक असून ती आठवडयातून किमान दोन वेळा पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष व सखी सावित्री समितीचे अध्यक्ष यांचे समक्ष उघडली गेली पाहिजे व प्राप्त तक्रारींवर सत्वर कार्यवाही होणे आवश्यक आहे.
६ शाळा सुटल्यांवर शाळा व शालेय परिसरात एकही विद्यार्थी थांबणार नाही याची खात्री करण्याचाबत शिक्षकाची डयुटी लावावी.
७ प्रत्येक शाळेत उपलब्ध शिक्षकांमधून एका शिक्षकाची विद्यार्थ्यांना अडचणीच्या प्रसंगी समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात यावी. समुदेशक शिक्षक यांनी नियमितपणे सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा, समुपदेशक बालकांचे समुपदेशन करुन बालकांचे मानसिक स्वास्थ व संतुलन राखण्याबाबत कार्यवाही होईल असे पहावे. सदर समुपदेशक शिक्षकांस संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेमार्फत यथावकाश आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल.
८ शाळांमध्ये बालसंरक्षण समिती स्थापन करण्यात यावी.
९ विद्यार्थी संरक्षणाच्या दृष्टीने शाळेच्या दर्शनी भागात सूचना फलकावर मुलांना समजण्यासाठी चित्राद्वारे सूचना देण्यात याव्यात.
१० राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेत नियमानुसार सखी सावित्री समिती गठीत करुन कार्यान्वित करावी व बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या समितीमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात यावे. तसेच याबाबतचा आढावा प्रत्येक त्रैमासिक बैठकांमध्ये घेण्यात यावा.
११ शाळा बसमध्ये शक्यतो महिला ड्रायव्हर व तसेच महिला मदतनीस असणे आवश्यक आहे.

शासनाने शासन निर्णय क्र सुरक्षा २०२४/प्र.क्र.२४३/एस.डी.-४, दिनांक २७.०९.२०२४ अन्वये व तसेच वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटकोर अंमलबजावणीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत निर्देश दिलेले आहेत.
प्रामुख्याने वर नमूद मुद्यांबाबत तात्काळ कार्यवाही होईल यासाठी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधीतांना निर्देश देण्यात यावेत.

(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

4 thoughts on “Vidyarthi Suraksha Upay Yojna विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजना”

Leave a Comment

error: Content is protected !!