२६ जानेवारी ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका याचे सामुहिक वाचन करण्याबाबत. Reading of Preamble before flag hoisting ceremony on January 26

Reading of Preamble before flag hoisting ceremony on January 26

Reading of Preamble before flag hoisting ceremony on January 26

Regarding the collective reading of the Preamble of the Constitution of India before the flag hoisting ceremony on January 26, 2020.

The Preamble to the Constitution of India should be read out in a group before the flag hoisting ceremony, which will be held every year from January 26, 2020.

Read Preamble Before Flag Hoisting Republic Day

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

दिनांक २६ जानेवारी, २०२० रोजी ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका / Preamble याचे सामुहिक वाचन करण्याबाबत.

तारीख: २२ जानेवारी, २०२०

   शासन परिपत्रक :-

भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले असून भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्य घटनेतील मुलतत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मुलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवूया……या ओळीला स्पर्श करून

२. त्यामूळे दिनांक २६ जानेवारी, २०२० पासून दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) / Preamble याचे सामुहिक वाचन करण्यात यावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००१२०१३११०८७४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

🌐👉 शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक 👈

(पं. खं. जाधव) उप सचिव,
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण २०२०/प्र.क्र.२५/आस्था-५
बांधकाम भवन, २५. मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
प्रत,

१. विभागीय आयुक्त, सर्व विभाग,

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद,

३. गट विकास अधिकारी, सर्व पंचायत समिती.

गट विकास अधिकारी, सर्व पंचायत समिती यांना सुचित येते की, सदर बाब सर्व ग्राम पंचायतींच्या निदर्शनास आणण्यात यावी

    परिशिष्ट-१

भारताचे संविधान

     उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचें एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांसः

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा

व उपासना यांचे स्वातंत्र्यः

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

व राष्ट्राची एकता आणि एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करुन स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.

Reading of Preamble before flag hoisting ceremony on January 26
Reading of Preamble before flag hoisting ceremony on January 26

Leave a Comment

error: Content is protected !!