Reading Inspiration Day
Reading Inspiration Day
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणे
Dr. A.P.J. Abdul Kalam’s birthday on 15th October as “Reading Inspiration Day”
दि. १४.१०.२०२४
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,मंत्रालय, मुंबई
क्रमांक : नविवि-२०२४/प्र.क्र.२५२/नवि-०३
दिनांक : ११ ऑक्टोबर, २०२४.
प्रति
सर्व सह सचिव/उप सचिव/ अवर सचिव/ कक्ष अधिकारी. नगर विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई
विषयः – माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत.
संदर्भ: मराठी भाषा विभागाचे दि. १३.०९.२०२४ रोजीचे शासन परिपत्रक
महोदय,
०२. उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन परिपत्रकाचे कृपया अवलोकन व्हावे. सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय संस्था/मंडळ, सार्वजनिक उपक्रम इत्यादी कार्यालयांना माजी राष्ट्रपती स्वर्गवासी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याबाबत मराठी भाषा विभागाने उपरोक्त परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. मराठी भाषेचा प्रचार. प्रसार, विकास, जतन, संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण आहे. या दिनाचे औचित्य साधून मराठीच्या प्रचार, प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. याअनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी मराठी भाषा विषयक विविध कार्यक्रम, उपक्रम. परिसंवाद आयोजन करण्याबाबत नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील मंडळे, महामंडळे, नगर पालिका, महानगरपालिका, सर्व क्षेत्रिय कार्यालये, अन्य संस्था यांना दरवर्षी मराठी भाषा विभागाकडून १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्य निर्गमित करण्यात येणाऱ्या परिपत्रकाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करणे,
👉वाचन प्रेरणा दिनानिमित्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा👈
२. नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील मंडळे, महामंडळे, नगर पालिका, महानगरपालिका, सर्व क्षेत्रिय कार्यालये, अन्य संस्था यांना नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व संस्था विशेषतः नगर पालिका, महानगरपालिका यांच्या हद्दीतील डिजिटल बोर्डवर मराठी भाषेच्या जतन, संवर्धन, विकास, प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने आवश्यक सूचना प्रसारीत करण्याच्या सूचना नगर विभागाने द्याव्यात.
०३. उपरोक्त बाबी साध्य करण्यासाठी मराठी भाषा धोरणातील नगर विकास विभागासाठी करण्यात आलेल्या शिफारसीची अंमलबजावणी सत्वरपणे करण्यात यावी. तसेच याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांना त्वरीत कळविण्यात यावे. हि विनंती. मराठी भाषा विभाग. शासन परिपत्रक दिनांक १३.०९.२०२४ महाराष्ट्र शासनाच्या🌐👉 www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकिर्ताक क्रमांक २०२४०९१३१९३९५७१२३३ असा आहे.
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन