Old Pension Scheme Applicable to Vastishala Volunteers
महाराष्ट शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत पुणे
क्र. प्राशिसं/२०२४/जू.पे.यो/२०२/ 4279
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद मुंबई, ठाणे पालघर रायगड, अहमदनगर, सोलापूर, जळगांव, धुळे, नंदूरबार, सांगली, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम बुलढाणा, नागूपर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर
दिनांक-१९/६/२०२४
विषयः- दि.१ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार वस्तीशाळेवर करार पध्दतीने मानधनी तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वस्तीशाळा स्वयंसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत
संदर्भः- मा. उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.२९/टीएनटी-६, दि.१३/३/२०२४
उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्रान्वये मा.श्री. कपिल पाटील, विधान परिषद यांनी शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि.१/०३/२०१४ नुसार वस्तीशाळेवर करार पध्दतीने मानधी तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वस्तीशाळा स्वयंसेवकांना जूनी पेंशन योजना लागू करणेबाबत विनंती केली आहे. सदर पत्रावर मा. मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांनी प्रधान सचिव कृ. तपासून तात्काळ सादर करावे असे निदेश दिले आहेत.
उपरोक्त मा.श्री.कपिल पाटील विधान परिषद यांचे निवेदन व त्यावर मा. मंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांनी दिलेल्या निदेशाच्या अनुषंगाने खालील नमूद मुद्दयाबाबत आपले अभिप्राय / अहवाल तात्काळ सादर करण्यात यावेत.
दि.१ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेतलेल्या १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कार्यरत्त वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणेबाबत शासनाने सदर कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या जिल्हयात वस्तीशाळा स्वयंसेवक नियमित शिक्षक म्हणून रुजू झालेल्यांची माहिती खालील प्रपत्रात तात्काळ आजच सादर करावी.
वस्तीशाळा स्वयंसेवकाचे नाव
जन्म तारीख
सेवानिवृत्ती दिनांक
वस्ती प्रथम दिनांक
शाळेत दि.१ नियुक्ती शासन सेवेत
मार्च २०१४ च्या निर्णयानुसार सामावून घेतलेल्या सध्या घेत असलेल्या पदाचे मूळ वेतन
स्वयंसेवकांचा दिनांक
(देविदास कुलाळ)
शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे