Increase Remuneration of CHB Teachers घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ

Increase Remuneration of CHB Teachers

image 45
Increase Remuneration of CHB Teachers

Increase Remuneration of CHB Teachers

Increase in Remuneration of Teachers employed on hourly basis in non-government private recognized schools

image 46

Increase Remuneration of CHB Teachers

दिनांक:- २१ नोव्हेंबर, २०२२

प्रस्तावना-
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते. संदर्भाधिन क्र.५ येथील शासन निर्णय दि.२७.११.२००६ अन्वये माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वांवर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय-
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


स्तर उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय
सुधारीत दर (प्रति तास) रू.१५०/-
स्तर माध्यमिक
सुधारीत दर (प्रति तास) रू.१२०/-

२. घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत. अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. सदर शासन निर्णय दि.०१/१२/२०२२ पासून अंमलात येईल.

अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत.

२. घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत. अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. सदर शासन निर्णय दि.०१/१२/२०२२ पासून अंमलात येईल.


३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.९४०/व्यय-५, दिनांक २७.०९.२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.


४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२२११२११५१६४९५२२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!