उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२वी फेब्रु मार्च २०२६ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत Class 12th Exam 2026 Application Forms Dates Apply Link

Class 12th Exam 2026 Application Forms Dates Apply Link

Class 12th Exam 2026 Application Forms Dates Apply Link

HSC Std 12th Exam 2026 Application Forms Dates

HSC EXAM FEB MAR 2026 ONLINE APPLICATION LINK

std 12 12th exam date scheduled online apply link

Regarding the dates for submission of application forms for the Higher Secondary Certificate (std 12th) February March 2026 examination

        • प्रकटन •

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी ) फेब्रु मार्च २०२६ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.


व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, III (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit मेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे

www.mahahsscboard.in

या संकेतस्थळावरुन भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे-
शुल्क प्रकार
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासकम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा

नियमित शुल्क
सामवार, दिनांक ०८/०९/२०२५
ते
मंगळवार, दिनांक ३०/०९/२०२५

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.


सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी ब्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे

१. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. UDISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल.

२. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्यांची माहिती UDISE मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलिन पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

सचिव, राज्य मंडळ, पुणे-०४.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४

दिनांक ०४/०९/२०२५

image 1
Class 12th Exam 2026 Application Forms Dates Apply Link

Leave a Comment

error: Content is protected !!