Appointment Of Counselors For Std 10th 12th Exam
Appointment Of Counselors For Std 10th 12th Exam
Appointment Of Counselors For Std 10th And Std 12th Examination 2025
Regarding the appointment of Counselors at the State level for Higher Secondary Certificate Std 12th and Secondary School Certificate Std 10th examinations.
Dahavi Baravi Pariksha Samupdeshak
! प्रकटन !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दि. १०/०२/२०२६ ते दि. १८/०३/२०२६ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा दि. २०/०२/२०२६ ते दि. १८/०३/२०२६ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आलेली आहे.
👉 परिक्षा कालावधीतील ताण निवारण अथवा अथवा मानसशास्त्रीय समुपदेशनासाठी टेलीमानस हेल्पलाईन क्र १४४१६ व मनोदर्पण हेल्पलाईन क्र ८४४८४४०६३२ वर विद्यार्थी,पालक अथवा शिक्षक यांनी संपर्क करावा.तसेच याबाबत प्रस्तुत परिषदेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विभागांतर्गतही समुपदेशकांची यादी उपलब्ध आहे.तेथेही संपर्क करून समुपदेशनाचा लाभ घेऊ शकता.(ही यादी या Link वर उपलब्ध आहे 👇)
https://www.maa.ac.in/documents/vgpg/Counselor_Final.pdf
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
१) ९९६०६४४४११
२) ७९७२५७३७४२
३) ९८३४०८४५९३
४) ९३५९९७८३१५
५) ८१६९२०२२१४
६) ९३७१६६१२५५
७)७२०८४२९३८१
८) ७७०९१५६०६८
९) ८४२११५०५२८
१०) ९४०४७८३९९६
उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८-०० ते रात्री ८-०० या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये याची नोंद घ्यावी.
दिनांक : ३०/०१/२०२६
सचिव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
